#कार्यकर्ता_महाराष्ट्राचा : शिक्षण क्षेत्रातून समाज बदलू पाहणाऱ्या निहाल किरनळ्ळी यांच्या कामाविषयी..

Admin | April 18, 2018 | 0 | News

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारी युवकांनी पुढाकार घेतला होता. जसं जमेल तसं युवकांनी ब्रिटिश सत्ता मोडीत काढण्यासाठी बंड पुकारले त्यात काहींना ब्रिटिशांनी संपवलं तर काही स्वतः फासावर गेले. आणि ते सर्व क्रांतिकारी आज स्वतंत्र भारतातील नवयुवकांचे प्रेरणास्रोत आहेत.

समाजाला आपण सुद्धा बांधील आहोत, आपण या मातीसाठी काहीतरी देणं लागतो ही भावना उराशी बाळगून आजची तरुणाई विविध क्षेत्रात चांगले बदल घडवण्यासाठी आपले योगदान देत आहे.

स्वातंत्र्य मिळून देशाला अनेक वर्ष लोटली आहेत पण अद्याप देशातील शिक्षण व्यवस्था बऱ्याच प्रमाणात मागासलेली आहे, जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणे गरजेचं आहे असं निहाल किरनळ्ळी सांगतो.

देश भ्रष्टाचारात बुडालेला असताना आण्णा हजारे यांच्या सारखे ज्येष्ठ व्यक्तिमत्व देशात ऐतिहासिक भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन पुकारतात आणि त्यामध्ये तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे सहभागी होतात. ह्याच आंदोलनातून प्रेरित झालेला एक महाविद्यालयीन तरुण निहाल किरनळ्ळी व्यवस्था परिवर्तन करण्याचे स्वप्न उराशी बाळगतो आणि आण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी होतो आणि नंतर शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी झगडू लागतो.

कर्नाटक राज्यातील यादगीर मधे अत्यंत सामान्य कुटुंबात १८ एप्रिल १९९५ रोजी जन्माला आलेल्या निहाल किरनळ्ळी या युवकाने प्राथमिक आणि अभियांत्रिकी पदविका शिक्षण सोलापूर मधे घेतले आहे.

निहाल अभियांत्रिकी शिक्षण घेत असतानाच देशभरात आण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन सुरू होते ज्यामधे तो सहभागी झाला आणि नंतर त्याच आंदोलनात अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या परिवर्तन संस्थेचे काम, त्यांना मिळालेला रेमन मॅगसेसे हा जागतिक पुरस्कार, माहिती अधिकार कायद्या साठी त्यांची लढाई हे सर्व बघून निहाल पुढे केजरीवाल यांनी आम आदमी पक्ष स्थापन केल्यावर पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून विविध विषयांवर काम करू लागला.

सक्रिय राजकारण करताना शिक्षण हा आवडीचा विषय असल्याने निहाल याने महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांचा सखोल अभ्यास करून साध्या सोप्या भाषेत समाज माध्यमांवर लिहून जनतेमध्ये प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न सुरू केला. सोलापूर मधे पदविका पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या निहालने शिक्षण घेत असतानाच महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेवर बारकाईने नजर ठेवली आणि व्यक्त होत राहिला ज्याचा परिणाम विविध वृत्तपत्रे निहालच्या लेखांची दखल घेत आहेत आणि प्रसिध्दी सुध्दा देत आहेत.

राज्यातील ४०९३ सरकारी शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय, रात्र शाळांमधील शिक्षकांची अनुपस्थिती, शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करणे अशा महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये निहालने अभ्यासू भूमिका मांडली आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रसिध्द केलेल्या माहितीचा, आकड्यांचा आणि आर्थिक सर्वेक्षणाचे विश्लेषण सुध्दा निहाल करत असतो.

निहाल लवकरच त्याचे परदेशातील उच्चशिक्षण पूर्ण करून मायदेशी येणार आहे आणि इथे आल्यावर पूर्ण वेळ राज्यातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी काम करणार आहे असे त्याने उगम महाराष्ट्रास बोलताना सांगितले आहे.

समाज व्यवस्थेत परिवर्तन आणण्यासाठी आजचा तरुण प्रयत्न करतोय. राजकीय व्यवस्थेला भिडत आहे अशाच क्रांतिकारी तरुणांची प्रेरणादायी माहिती आम्ही “उगम महाराष्ट्र” तर्फे समोर घेवून येणार आहोत.

Related Posts

शिक्षक भरती साठी आता उपोषण अस्त्र.!

शिक्षक भरती नावाचा घोळ..!

Admin | May 28, 2018 | 0

शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही." असे खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे आणि त्याप्रमाणे राज्यातील बी.एड डी.एड झालेले विद्यार्थी आपल्या हक्कासाठी लढत…

पुन्हा आघाडीचं..!

Admin | May 4, 2018 | 0

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी ने पुन्हा संसार थाटण्याचा (आघाडी करण्याचा) निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन्ही पक्ष विधान परिषदेच्या ३-३ प्रत्येकी जागा लढवतील. सध्या विधानपरिषदेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ युतीपेक्षा जास्त…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *